मुखपृष्ठ

सोमपूर बद्दल

नाशिक हा पर्यटन जिल्हा म्हणुन नावारुपाला आलेला आहे.लहानमोठ्या पंधरा तालुक्यांनी मिळून आपला नाशिक जिल्हा बनलेला आहे.या १५ तालुक्यातील आपला बागलाण ऐतिहासिक वारसा लाभलेला ,निसर्ग सौंदर्याने नटलेला, लहानलहान गाव मिळून बनलेला असा तालुका म्हणजे बागलाण.या तालुक्यामध्ये ताहाराबाद  ते जायखेडा या मुख्य रस्त्याला लागून असणारा,मोसम नदीच्या तीरावर वसलेले , चहुबाजूनी सुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेला आपला छोटासा निसर्गरम्य गाव म्हणजे सोमपूर गाव शेती साठी प्रगतशील असलेले  लोकांचे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गावची ओळख,. बागलाण  तालुक्यापासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर असलेला आपला छोटासा गाव.

           गावाची लोकसंख्या सुमार ३१९२  एवढी आहे. या गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात.”पाणी म्हणजे जीवनयाप्रमाणे लोकांचे जीवन अवलंबून असलेल्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने गाव सुजलाम सुफलाम आहे. त्याचप्रमाणे या गावात विविध निसर्गरम्य परिसर, आकर्षक मंदिरे प्रेक्षणीय स्थळे म्हणून ओळखली जातात.

 

सौ.क्रांती प्रमोद भामरे

सरपंच

श्री. दादाजी बाळू अहिरे

उपसरपंच

श्री.के.एस.राठोड

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

ग्रामविकास व पंचायतराज विभाग

लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाची उभारणी

ग्रामपंचायत सोमपूर कडून लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे त्याचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे CEO माननीय श्री ओंकार पवार साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री.महेश पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक 26/11/25 यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यासाठी विविध स्तरावरून मदत प्राप्त होत आहे. अजून बरेच काम अपूर्ण आहेत .तरी ज्यांना मदत करायची आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्वरित मदत पाठवावी.🙏🏻 सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कर्मचारी ग्रामपंचायत सोमपूर. 1) आपल्या गावचे भूमिपुत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक माननीय श्री महेश पाटील यांच्याकडून 15000 2) आमचे बंधू माननीय श्री सुधीर दादा भामरे यांच्याकडून अभ्यासिकेसाठी संपूर्ण फर्निचर 3) आपल्या गावचे भूमिपुत्र श्री नितीन चव्हाण यांच्याकडून अभ्यासिकेसाठी ट्यूबलाईट व फॅन 4) श्री. सुरेश गंगाधर भामरे यांच्याकडून 5000 5) श्री संभाजी भाऊराव भामरे यांच्याकडून 2100 6) प्रार्थमिक शिक्षक श्री नंदलाल सिताराम भामरे यांच्याकडून 2100 7)नासिक पंचायत समिती गटविकास अधिकारी माननीय सूर्यवंशी बाबा यांच्याकडून अभ्यासिकेसाठी पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सर्वांचे ग्रामपंचायत सोमपुर तर्फे हार्दिक आभार🙏 धन्यवाद 🙏